Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या मद्यपींवर सरकार मेहेरबान

drink
, शनिवार, 30 डिसेंबर 2023 (18:06 IST)
नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या मद्यपींवर सरकार मेहेरबान झाले आहे. 31 डिसेंबरला मुंबईतील वाईन शॉप मध्यरात्री 1 वाजेपर्यंत, तर बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील किरकोळ, विदेशी मद्य विक्रीच्या दुकानांना बंद करावयाच्या वेळेत शिथिलता देण्यात आली आहे.
 
ही शिथिलता 31 डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेपासून ते दुस-या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत असणार आहे. म्हणजेच वाईन शॉप 1 वाजेपर्यंत उघडे राहणार आहेत.कोविडच्या संकटामुळे दोन वर्ष घरात बसावे लागलेल्या लोकांच्या उत्साहाला उधाण आले असून, सगळेच सणवार, वेगवेगळे डेज जल्लोषात साजरे करण्याची स्पर्धाच लागली आहे. नवीन वर्षाच्या स्वागताचीही जोरदार तयारी सुरू आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने सर्व वर्गाला खुश करण्यात सत्ताधारी मंडळी मग्न आहे. लोकांच्या उत्साहाला आणखी कैफ यावा यासाठी सरकारने मद्यालयांनाही 31 डिसेंबरला खुली सुट दिली आहे. वाईनशॉप रात्री एक वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. तर बिअरबार,परमिटरूम पहाटे पाच वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी मिळाली आहे.
 
तसेच क्लब अनुज्ञप्ती व परवाना कक्ष यांना पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री साडेअकरा ते दुस-या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत आणि पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री दीड ते दुस-या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत शिथिलता असेल. सीएल -३ अनुज्ञप्ती यांना महानगरपालिका तसेच ‘अ’, व ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तींसाठी रात्री 11 ते दुस-या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री 10 ते दुस-या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत शिथिलता असणार आहे. ही वेळेची शिथिलता 31 डिसेंबर रोजी असेल, असे आदेशान्वये मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी कळविले आहे.
 
मुंबईच्या रस्त्यावर तब्बल11,500 पोलीस असणार तैनात
 
मुंबई : मुंबईत 31 डिसेंबरच्या रात्री समुद्र किनाऱ्यांवर नागरिकांची मोठी गर्दी होते. समुद्र किनाऱ्यांवर फटाक्यांच्या आतिषबाजीत नववर्षाचे स्वागत केले जाते. यासाठी हजारो मुंबईकर मुंबईच्या चौपट्यांवर दाखल होतात. अनेकजण मुंबईत पार्टी करतात. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आणि बेस्ट बस प्रशासनाकडून 31 डिसेंबरच्या रात्रीसाठी महत्त्वाची योजना आखण्यात आली आहे. नववर्षाच्या आगमनाकरिता मुंबई पोलीस सज्ज झाले असून 31 डिसेंबरला मुंबईच्या रस्त्यावर तब्बल 11,500 पोलीस असणार तैनात आहेत.
 
नागरिकांना नववर्ष आगमन सुरक्षितपणे आणि निर्विघ्नपणे साजरा करता यावा याकरीता पोलीस सज्ज झाले आहेत. मुंबई पोलीस दलाकडून 22 पोलीस उप आयुक्त, 45 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2051 पोलीस अधिकारी आणि 11500 पोलीस अंमलदार बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत. त्यांच्यासोबत महत्वाच्या ठिकाणी एस.आर.पी.एफ. प्लाटून, क्यूआरटी टीम्स, आरसीपी, होमगार्डस् असा चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आलेले आहे.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रामलाला यांच्या आगमनानिमित्त 22 जानेवारी रोजी दिवाळी साजरे करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन