Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शासनातर्फे वारकऱ्यांना मिळणार विमा संरक्षण, मुख्यमंत्र्यांची घोषणा

शासनातर्फे वारकऱ्यांना मिळणार विमा संरक्षण, मुख्यमंत्र्यांची घोषणा
, बुधवार, 21 जून 2023 (15:34 IST)
राज्य शासना तर्फे पंढरपुरातील आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. वारी दरम्यान होणाऱ्या अपघातात वारकरी जखमी होतात किंवा मृत्युमुखी होतात. या परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या साठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. 
 
या योजने अंतर्गत लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. हे विमा संरक्षण वारीच्या 30 दिवसांसाठी असणार. 

या विमा संरक्षण योजने अंतर्गत एखाद्या वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले जातील. तसेच अपघातात कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास कुटुंबियांना एक लाख रुपये दिले जातील.अंशतः अपंगत्व आल्यास रुपये 50 हजार आणि वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजाराचा खर्च शासनातर्फे देण्यात येईल. या बाबत शासनाचा निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.  ही योजना मदत व पुनर्वसन विभागामार्फत राबविण्यात येईल.  
 





Edited by - Priya Dixit 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई: कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवर ईडीची छापेमारी