छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरीची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रविवारी रात्री उशिरा काही चोरट्यांनी एटीएम मशीन कटरने कापण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र चोरट्यांच्या चुकीमुळे एटीएम मशीनला अचानक लागलेल्या आगीमुळे एटीएम मशीन मधील नोटा जळून खाक झाल्या. सदर घटना दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळीवाडा येथे एसबीआयच्या बँकेच्या एटीएम मध्ये घडली.
रविवारी रात्री उशिरा काही चोरटे एटीएम मधून चोरीच्या उद्देश्याने गेले आणि त्यांनी एटीएम मशीन कापण्यासाठी कटरचा वापर केला. मात्र प्रयत्न करून देखील त्यांना मशीन कापता आले नाही. कटरच्या ठिणगीमुळे एटीएम मशीन ला आग लागली आणि त्यातील पैसे देखील जळून खाक झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
या सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे की, दोन चोरटे एटीएम मध्ये शिरले आणि मशीनला कापत आहे. मशीन कापत असताना अचानक आग लागली आणि एटीएम मशीन आणि त्यातील नोट जळाले. स्थानिकांनी एटीएम मशीन जळालेली पाहून पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी अग्निशमन दल आणि गुन्हे शाखेच्या पथकाला घटनास्थळी पाचारण केले.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला आहे. अद्याप एटीएम मध्ये किती रक्कम होती. आणि जळून किती खाक झाली हे समजू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.