Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोखंडी दाराचे टोकदार टोक लहान मुलाच्या हातात घुसले

लोखंडी दाराचे टोकदार टोक लहान मुलाच्या हातात घुसले
, बुधवार, 1 मे 2019 (10:22 IST)
सध्या लहान मुलांना शाळेच्या सुट्ट्या सुरु आहेत. त्यामुळे मुले बाहेर खेळाचा मोठा आनंद घेत आहेत. मात्र त्यांचा खेळ सुरु असतांना जर अपघात झाल तर तो त्यांच्या जीवाशी येऊ शकतो, असाच प्रकार ठाणे येथे घडला आहे. लोखंडी प्रवेशद्वारावरील असलेले तीक्ष्ण लोखंडी टोक हातात घुसलेल्या 11 वर्षीय मुलाची ठाणे अग्निशमन दलाने प्रयत्न करत  सुखरुप सुटका केली, या मुलाचे नाव  हर्ष शिंदे आहे. तो लुईसवाडी परिसरातील रहिवासी आहे. अतिशय थरारक, अंगावर शहारा आणणारी दुर्घटना घडली होती. मात्र अग्निशामन दलाला घटनेची माहिती मिळताच एक फायर इंजिन घटनास्थळी पाठवण्यात आले. आणि अथक प्रयत्न करत या मुलाची या लोखंडी तुकड्यातून सुखरुप सुटका केल्यानंतर सिव्हिल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आता उन्हाळाची सुट्टी लागली असून पालकांनी अधिक सतर्क राहून आपल्या पाल्याकडे लक्ष देणं महत्वाचं असल्याचं या दुर्घटनेमुळे प्रकर्षाने जाणवत आहेत. त्यामुळे मुलानां खेळताना कोठे नदी, नाला, रहदारीचा रस्ता, निर्जन स्थळ आणि डोळ्याच्या आड होईल असे कोठेही पाठवणे धोकादायक ठरू शकते त्यामुळे पालकांनी काळजी घेणे गरजेचे ठरते आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दोघा पोलिसांवर जबरी चोरीचा गुन्हा, दोघे गेले होते छापा टाकायला