नाशिकात जय भवानी रोड परिसरातील रहिवाशांची सकाळी 8:30 वाजेपासून बिबट्या दिसल्याने धांदल उडाली. हा बिबट्या रामजी सोसायटीतील 'गायकवाड निवास ' या बंगल्याच्या परिसरात एका वाहनाखाली दडून बसला होता.
या परिसरात बिबट्या असल्याची माहिती मिळतातच वन विभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची चांगलीच दमछाक झाली. अथक प्रयत्नानंतर वन विभागाच्या पथकाने या बिबट्याला जेरबंद केले. स्थानिकांनी बिबट्याला बघण्यासाठी गर्दी केली होती.
पोलिसांनी हा परिसर नागरिकांसाठी प्रतिबंधित केला होता. हा बिबट्या सकाळी 8:30 वाजता नाशिकच्या जय भवानी रोड रस्त्यावर दिसला होता. नंतर हा बिबटया गायकवाड निवास येथे एका वाहनाखाली दडून बसलेला होता. या बिबट्याने एका वृद्ध नागरिकांवर हल्ला केला असून ते जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने या बिबट्याला पकडण्यासाठी त्याला बेशुद्ध करण्यासाठी
भुलीचे इंजेक्शन देण्यात आले.अखेर वन विभागाच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला पकडण्यात आले. बिबट्या पकडला गेल्यामुळे स्थनिकांनी आणि वन विभागाच्या पथकांनी सुटकेचा श्वास घेतला.