Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मणिपूरमधून महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना सुखरुप परत आणले

eknath shinde devendra fadnavis
, सोमवार, 8 मे 2023 (21:50 IST)
मागच्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला आहे.यात  मणिपूरमध्ये महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकले होते. त्यांना आता महाराष्ट्र सरकारने सुखरुप परत आणलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
 
मणिूपर IIT विद्यापीठात शिकण्यासाठी गेलेले काही महाराष्ट्रातील विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांना सुखरुप राज्यात आणलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. या विद्यार्थ्यांना योग्य ती सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी विनंती शिंदे यांनी या दोघांनाही केली आहे.
 
मुख्यमंत्री शिंदे यांनी बंगळुरु येथून मणिपूरमधील मराठी विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. महाराष्ट्र सरकारच्य मदतीमुळे मणिपूरमध्ये अडकलेले विद्यार्थी मणिपूरमधून सुखरुप बाहेर पडले आहेत. आता सर्व विद्यार्थी शासनाच्या मदतीने एका विशेष विमानाने महाराष्ट्रात सा़डेसात वाजेपर्यंत पोहोचले आहेत. आता हे विद्यार्थी त्यांच्या गावाकडे रवाना झाले आहेत.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिंदेना महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही, कर्नाटकमध्ये कोण ओळखणार, अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला