Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील पोलिसच निघाला दारू तस्कर केली त्याला अटक

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील पोलिसच निघाला दारू तस्कर केली त्याला अटक
, सोमवार, 10 जून 2019 (10:18 IST)
चंद्रपूर जिल्ह्यमध्ये दारूबंदी असताना दारुची तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या पैकी एकजण राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हा नागपूर पोलीस दलातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारा पोलीस शिपाई आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सचिन हांडे आणि प्रणव म्हैसेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. सचिन हाडे हा सिताबर्डी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्य़रत आहे. तर प्रणव म्हैसकर हा एका विरष्ठ सरकारी अधिका-याचा नातेवाईक आहे. त्यांच्याकडून ९ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये विदेशी दारूच्या ८ पेट्यांचा समावेश आहे.नागपूरमधून चंद्रपूरला एका गाडीतून दारूची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली. त्यानुसार आज पोलिसांनी नंदोरी टोलनाक्यावर एक इटियॉस क्रॉस (एमएच ३१ ईयू ४८७३) गाडी आडवण्यात आली. या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये ८ पेट्या विदेशी दारू सापडली असून जप्त केलेली दारू आणि गाडीची किंमत अंदाजे ९ लाख ३५ हजार रुपये सांगण्यात आली आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होणार