एक तरुणी बेपत्ता झाली होती. या तरुणीला शहरातीलच एका तरुणाने पळवून नेले, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. या प्रकारामुळे आमची बदनामी झाली आहे, तसेच माझ्या मुलाला धमकी दिल्यामुळे तो भयभीत झाला आहे, अशी तक्रार त्या मुलाच्या वडिलांनी राजापेठ पोलिसांत दिली आहे. या तक्रारीवरुन राजापेठ पोलिसांनी खासदार राणा यांच्याविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची (एनसी) नोंद केली आहे.
रुक्मिनीनगर भागातील तरुणी गेल्या ५ सप्टेंबरला दुपारपासून घरुन बेपत्ता झाली होती. दरम्यान या प्रकरणात भाजप पदाधिकारी आणि खासदार नवनित राणा यांनी ६ सप्टेंबरला दुपारी बारा वाजताच्या सुमारास राजापेठ पोलीस ठाणे गाठले. बेपत्ता असलेल्या तरुणीला शहरातीलच एका दुसऱ्या धर्माच्या मुलाने पळवून नेले आहे, त्याला सर्व माहीत आहे, मात्र तो पोलिसांना माहीती देत नाही, पोलिस त्याच्याकडून मुलीची माहिती काढण्यासाठी अपयशी ठरत असल्याचा आरोप करुन खासदार राणा यांनी पोलिसांवर चांगले तोंडसुख घेतले होते.