आज दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद झाली. आज दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन (Online result) निकाल पाहता येणार आहे. यंदाचा 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
राज्यातील 22 हजार 921शाळामधून 16 लाख 38हजार 946 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर 29 टक्के शाळांचा निकाल शून्य टक्के लागला. यंदाही दहावी परीक्षेत कोकण विभागाने बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा आहे.
राज्यभरातून तब्बल 16,38,964 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 97.96 असून विद्यार्थ्यांचा निकाल 96.06 आहे. यंदाच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना वेबसाईटवर पाहता येणार आहे.
राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के
कोकण - 99.27 टक्के
पुणे- 96.96 टक्के
कोल्हापूर - 98.50 टक्के
अमरावती - 96.81 टक्के
नागपूर - 97 टक्के
लातूर - 97.27 टक्के
मुंबई - 96.94 टक्के
नाशिक - 95.90 टक्के