Publish Date: Wed, 29 Mar 2023 (11:56 IST)
Updated Date: Wed, 29 Mar 2023 (12:00 IST)
रिक्षा चालकाची अरेरावी करत प्रवाशाला मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. घडलेला प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. सदर घटना डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनपरिसरातील इंदिरा चौकात घडली आहे.
फिर्यादीने सांगितले की, नेहमी प्रमाणे रिक्षा घेऊन रात्री साडे अकराच्या सुमारास घरी जात असताना रिक्षा चालकाने नेहमी पेक्षा जास्त भाडे सांगितले. मी जास्त भाडे का घेणार विचारले असता रिक्षा चालकाने मारहाण करायला सुरु केले. या मारहाणीत प्रवाशी जखमी झाला आहे. हे संपूर्ण प्रकरण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून रिक्षा चालकाच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात फिर्यादीने तक्रार दाखल केली असून रिक्षा चालकाचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.