राज्यात पुन्हा स्वाईनफ्लूने डोकं वर काढलं आहे. स्वाईनफ्लूने राज्यात पाय पसरू नये म्हणून आरोग्य विभागाकडून निर्देश देण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. सध्या नाशिकात स्वाईनफ्लूचा जोर वाढला आहे. नाशिकात या रोगाचे तीन रुग्ण आढळले आहे. स्वाईनफ्लू मुळे एकाचा मृत्यू झाला आहे. स्वाईनफ्लूला घेऊन आरोग्य प्रशासन जिल्ह्यात अलर्ट आहे. या साठी आरोग्य विभागाने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहे.
नाशिकात सिन्नर मध्ये एका महिलेचा स्वाईनफ्लूमुळे मृत्यू झाला असून दोघांवर उपचार सुरु आहे. उपचाराधीन रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेच्या मृत्यूने शहरात आणि जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नागरिकांना गर्दीत जाताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्वाईन फ्लू म्हणजे काय ?त्याची लक्षणे काय आहे ?
H1N1 इन्फ्लूएंजा ए व्हायरस मूलतः डुकरांपासून मानवांमध्ये पसरतो. आता हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो. स्वाइन फ्लूची लक्षणे नेहमीच्या इन्फ्लूएंझा सारखीच असतात. यामध्ये ताप, डोकेदुखी, थंडी वाजून ताप येणे, जुलाब, खोकला आणि शिंका येणे यासारख्या लक्षणांचा समावेश होतो. फ्लूच्या हंगामात, मूलभूत स्वच्छतेची काळजी घेऊन आणि सर्जिकल मास्क घातल्याने हा संसर्ग टाळता येतो
स्वाइन फ्लूची बहुतेक लक्षणे सामान्य इन्फ्लूएंझा सारखीच असतात. स्वाइन फ्लूच्या लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे:
ताप,डोकेदुखी, थंडी वाजणे,अतिसार,खोकला, शिंका येणे,घसा खवखवणे, थकवा येणे असे लक्षण आढळून येतात.नेहमीच्या फ्लूप्रमाणे, स्वाइन फ्लूमुळे न्यूमोनिया (फुफ्फुसाचा विकार) आणि श्वासोच्छवासाच्या समस्या यासारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. ज्या लोकांना दमा आणि मधुमेह आहे, त्यांची लक्षणे आणखी वाढू शकतात. श्वास लागणे, उलट्या होणे, ओटीपोटात दुखणे, चक्कर येणे किंवा गोंधळ यांसारखी लक्षणे आढळल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.