Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रुबी हॉस्पिटलने व्यावसाईकता जपली मात्र नवजात मुलीने गमावला जीव

रुबी हॉस्पिटलने व्यावसाईकता जपली मात्र नवजात मुलीने गमावला जीव
, सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 (10:37 IST)
पुण्यात एका नवजात मुलीचा उपचार न झाल्यानं मृत्यू झाला आहे. रुबी हॉस्पिटलनं पैसे भरा नंतरच ऑपरेशन करू अशी भूमिका घेतल्यानं उपचारांअभावी बाळाचा मृत्यू झालाआहे. त्यामुळे नोटबंदीच्या याप्रकारात केंद्र आणि राज्यसरकार यांनी घेतलेल्या निर्णयाला हा  हॉस्पिटल ने केराची  टोपी  दाखवली आहे.  
 
पुण्यातल्या आम्रपाली खुंटे यांनी केईएम हॉस्पिटलमध्ये एका मुलीला जन्म दिला होता. मात्र त्यांच्या नवजात मुलीच्या ह्रदयात जन्मजात दोष होता, तातडीनं तिच्यावर उपचार करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. खुंटे कुटुबीयांनी तातडीनं रुबी हॉस्पिटल येथे गेले . रुबी हॉस्पिटल व्यवस्थापनाने साडेतीन लाख रुपये भरण्यास सांगितले होते. नोटाबंदीमुळे तातडीनं पैशाची व्यवस्था झाली नाही.मात्र  हॉस्पिटल प्रशासन पैसे भरा नंतरच ऑपरेशन करु असे म्हणत होते.  त्यामुळे संबंधित बालकावर उपचार होऊ शकले नाही,  बाळाचा पहाटे मृत्यू झाला होता. 
 
बाळ रुबीत आणलंच नाही, त्यामुळं बाळाच्या मृत्यूला हॉस्पिटल जबाबदार नसल्याचा दावा रुबी हॉस्पिटलनं केला आहे . मात्र जर कमिटी डॉक्टर आहेत आणि तेच ठरवितात तर मग कोणत्या प्रशासनाने हे उपचार नाकारले असा सवाल पुढे येतोय. रुबी सारख्या हॉस्पिटलची  मनमानी हाणून पाडा असे सर्वच थरातून मागणी होत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बचत खाते उघडून पोस्ट ऑफिस करणार शेतकरी वर्गास मदत राज्यातला अभिनव उपक्रम