Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा तर ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस शनिवारी शहरातील ‘या’ केंद्रावर मिळणार

‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा तर ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस शनिवारी शहरातील ‘या’ केंद्रावर मिळणार
, शनिवार, 29 मे 2021 (07:42 IST)
पिंपरी-चिंचवड शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांना शनिवारी कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा तर ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. ‘कोव्हॅक्सिन’चा डोस 8 केंद्रावर दिला जाणार असून एका केंद्रांवर 150 जणांना लस दिली जाणार आहे. तर, कोविशिल्डचा पहिला, दुसरा डोस 57 केंद्रांवर दिला जाणार आहे. एका केंद्रांवर 100 जणांना लस दिली जाणार आहे.
 
कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस पहिल्या डोसनंतर 28 दिवस झालेल्यांना देण्यात येणार आहे. तर, शासनाने दिलेल्या निर्देशानुसार शनिवारी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर वयवर्षे 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे.
 
या आठ केंद्रांवर मिळणार ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा दुसरा डोस!
यमुनानगर रुग्णालय, तालेरा रुग्णालय, सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, नवीन जिजामाता रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, पिंपरी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन आकुर्डी रुग्णालय आणि कासारवाडी दवाखाना या केंद्रावर ‘कोव्हॅक्सिन’ या लसीचा दुसरा डोस सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मिळणार आहे.
 
‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस या 57 केंद्रांवर मिळणार लस!
नवीन आकुर्डी रुग्णालय, हेडगेवार जलतरण तलाव,संजय काळे सभागृह,ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर,साई आंब्रेला संभाजीनगर,रोटरी क्लब सेंटर  आरटीटीसी सेंटर,महापालिका कन्या शाळा, चिखली,घरकुल दवाखाना चिखली,
महापालिका शाळा जाधववाडी,रुपीनगर शाळा,स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर,तळवडे समाज मंदिर शाळा, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल जिजामाता पार्क फुलेनगर, प्राथमिक शाळा म्हेत्रेवस्ती,महापालिका शाळा खराळवाडी, नेहरूनगर उर्दू शाळा,मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल,एसएस अजमेरा स्कुल, अजमेरा,दीनदयाल शाळा संत तुकारामनगर,क्वालिटी सर्कल भोसरी,समता स्कुल चक्रपाणी वसाहत भोसरी,संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर,
नवीन भोसरी रुग्णालय,महापालिका शाळा बोपखेल,सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी,सखुबाई गार्डन भोसरी,
मोशी दवाखाना,छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी,गंगोत्री पार्क दिघी,बाबा मंगल कार्यालय धावडे वस्ती,
पंडित जवाहरलाल नेहरु शाळा चऱ्होली,बास्केटबॉल ग्राऊंड स्पाईन रोड मोशी,पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, अहिल्याबाई होळकर महापालिका शाळा सांगवी,गणेश इंग्लिश स्कुल दापोडी,शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी,
बालाजी लॉन्स जुनी सांगवी,खिंवसरा हॉस्पिटल थेरगाव, पिंपळेनिलख इंगोले महापालिका शाळा,हापालिका शाळा वाकड,आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती,मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, वाकड,यशवंतराव प्राथमिक महापालिका शाळा ग प्रभाग,भाटनगर दवाखाना पिंपरी,महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी,अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर,महापालिका शाळा रहाटनी,कर्मवीर भाऊराव पाटील शाळा पिंपरीवाघेरे,फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन,तालेरा रुग्णालय चिंचवड,महापालिका शाळा किवळे,गुरुद्वारा वाल्हेकरवाडी,बिजलीनगर दवाखाना,बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे,कामत हॉस्पिटल पिंपरी नर्सिंग स्कुल चिंचवड,मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे,अश्विनी मेडिकल फाऊंडेशन मोरया हॉस्पिटल चिंचवड,प्रेमलोक पार्क दवाखाना,महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मिळणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘जीवनदूत’ उपक्रमांतर्गत पोलिसांना गस्त घालण्यासाठी 100 स्मार्ट सायकल