Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईकर प्रदूषणाच्या विळख्यात पुढील दिवस परिस्थिती बिघडणार

pollution
, शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (21:05 IST)
मुंबई : येथील किमान तापमानामध्ये घट झाल्यानंतर आता मुंबईच्या प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुंबईची हवा गुरुवारी (दि. २२, २३ ) ‘वाईट’ होती. चेंबूर, माझगाव, अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल येथील हवेची गुणवत्ता दिवसभर ‘अतिवाईट’ नोंदविण्यात आली आहे. 
 
मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक गुरुवारी संध्याकाळी २८०च्या पुढे होता. चेंबूर येथे ३२३, माझगाव येथे ३१६, वांद्रे-कुर्ला संकुल येथे ३३७ तर अंधेरी येथे ३१५ असा पीएम २.५ चा निर्देशांक नोंदविण्यात आला आहे. कुलाबा येथे पीएम २.५ चा निर्देशांक २७६ तर मालाड येथे २९५ होता. भांडुप, वरळी, बोरिवली येथे हवेची गुणवत्ता मध्यम होती. या सगळ्याच केंद्रांवर ‘पीएम २.५’ या प्रदूषकाचे प्रमाण वाढल्याची नोंद झाली आहे. या काळात अतिरिक्त थकवा जाणवण्याची शक्यता देखील वाढू शकते. फुप्फुसांचे आजार असणाऱ्यांना किंवा हृदयरोग असणाऱ्यांना हा त्रास अधिक जाणवू शकतो.
 
‘सफर’ या हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या प्रणालीच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २ दिवस हवा वाईट ते अती वाईट या श्रेणीत असणार आहे. २५ डिसेंबरच्या आसपास मुंबईच्या तापमानाचा पारा आणखी उतरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत थंडीची तीव्रता काही काळ वाढणार असल्याने त्याचा परिणाम प्रदूषणावर देखील होण्याची शक्यता आहे. या काळामध्ये किमान तापमानाचा पारा १३ ते १४ अंशांपर्यंत खाली येऊ शकतो. कमाल तापमानात देखील घट होऊ शकते. त्यामुळे पुन्हा एकदा धुरक्याची जाणीव देखील मुंबईकरांना होऊ शकते. 
 
Edited By -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुरेशदादा जैन आजारी, त्यांच्यावर मुंबईला होणार उपचार