Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘अग्निवीर’ अक्षय गवते यांच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत

eknath shinde
, गुरूवार, 26 ऑक्टोबर 2023 (20:49 IST)
मुंबई,  : सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
 
जवान अक्षय गवते हे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील रहिवाशी होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयच्या निधनाबद्दल त्याच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुर्दैवी : शेतीची मशागत करताना अनर्थ घडला, रोटाव्हेरमध्ये अडकून टॅक्टर चालकाचा मृत्यू