Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्य सरकार रेशनकार्ड धारकांना दिवाळीनिमित्त धान्य किट देणार

राज्य सरकार रेशनकार्ड धारकांना दिवाळीनिमित्त धान्य किट देणार
, मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (11:06 IST)
राज्यात  शिंदे-फडणवीस सरकार ने दिवाळी निमित्त रेशन कार्ड धारकांना शंभर रुपयांत चार उपयोगी वस्तूंचा किट देण्याचा निर्णय घेतला. 
यंदाची दिवाळी सर्व सामान्यांची गोड जावी या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, शिधापत्रिकाधारक पात्र लाभार्थ्यांना दिवाळी उत्सव किट (Diwali utsav kit)साखर, रवा, पाम तेल आणि चनाडाळ फक्त रु.100 मध्ये उपलब्ध करून दिली जाईल. अंबरनाथ विधानसभा मतदार संघातील लाभार्थ्यांना हे "दिवाळी उत्सव किट" उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी अंबरनाथ व उल्हासनगर शिधावाटप कार्यालयातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीचा आढावा घेतला. या बैठकीत अंबरनाथ शिधावत अधिकारी शशिकांत पाटसुळे, उल्हासनगर शिधावत अधिकारी पंडित राठोड, निरीक्षक संतोष मोरे, युसूफ शेख, पांडुरंग रानडे, निसार खान आदी होते.
दिवाळी धान्य किट हे कधी मिळणार याची अद्याप माहिती नाही. दिवाळी काही दिवसांवर आली असता अद्याप धान्य किट  रेशनच्या दुकानात आलेली नाही. 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Omicron BF.7 in India: कोरोनाचा नवीन व्हेरियंट भारतात पोहोचला , तज्ञांचा इशारा