कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य माहिती आयोगाने आता नागरिकांसाठी पुढाकार घेत ई-मेलद्वारे सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. राज्य माहिती आयोग खंडपीठ नागपूर या कार्यालयाकडे प्रत्यक्ष न येता नागरिकांनी आयोगाच्या ई-मेलवर स्वत:च्या ई-मेलद्वारे सर्व कागदपत्राच्या छायांकित प्रती २० रुपयाचे स्टॅम्प लावून अर्ज केल्यास तात्काळ सुनावणी आयोजित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आयोगाकडे असा पत्रव्यवहार करताना अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी नमूद करावा. राज्य माहिती आयोगाचा ईमले आयडी
[email protected] व
[email protected] असा आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जरी नागरिकांना आयोगाचे कार्यालयात व्यक्तिश: येणे शक्य होत नसले तरीही अप्रत्यक्षपणे अंतरावरुन आयोगाचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. मागील दोन वर्षापासून आजमितीस आयोगाकडे प्राप्त होऊन नोंदविलेल्या दोन हजार द्वितीय अपील अर्जावर व सातशे तक्रार अर्जावर सुनावण्या घेण्यासंदर्भात कामकाज करण्यात येत आहे.