Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात कडाक्याची थंडी पडणार, हवामान खात्याचा इशारा

राज्यात कडाक्याची थंडी पडणार, हवामान खात्याचा इशारा
, गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (21:03 IST)
दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात वातावरणात गारवा जाणवायला लागला आहे. पुढील ४ दिवस राज्यात कडाक्याची थंडी पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागातील तापमान २-३ डिग्री सेल्सियसने घसरणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. राज्यासह पुढील ४-५ दिवस भारतातील वायव्य आणि मध्य भारत तसेच गुजरातच्या बहुतेक भागांमध्ये देखील कडाक्याची थंडी पडणार आहे. या भागातील तापमानात २-४ अंश सेल्सियसने घसरण्याची शक्यता आहे. 
 
पुढील काळात उत्तर आणि मध्य भारतातील बहुतांश भागातील तापमानात विशेष बदल होणार आहेत. त्यानंतर तापमाना त हळू हळू घट होणारआहे. महाराष्ट्रातील उत्तर – मध्य व संलग्न मराठवाडा तसेच विदर्भात थंडीचा सर्वाधिक प्रभाव जाणवणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Omicron in Gujarat: गुजरातमध्ये महिला आरोग्य कर्मचारी ओमिक्रॉन पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या 5 झाली