Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एसटी महामंडळाला संपाचा मोठा फटका, 119 आगार बंद असल्यामुळे 55 कोटींचा तोटा

एसटी महामंडळाला संपाचा मोठा फटका, 119 आगार बंद असल्यामुळे 55 कोटींचा तोटा
, सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (12:18 IST)
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीला घेऊन राज्यात विविध ठिकाणी एसी कर्मचाऱ्यांनी संप केला आहे. या मुळे सुमारे 119  आगार बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आणि एसटी महामंडळाला याचा फटका बसला असून 55 कोटी पेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे विलीनीकरणाच्या मागणीला घेऊन कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे आणि संप केला आहे त्यामुळे एसटीच्या बस या मार्गावर धावत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. त्यांना सणासुदीच्या काळात गावी गेलेल्या प्रवाशांना येणे कठीण झाले आहे .या संपाचा फटका प्रवाशांना देखील बसला आहे.

राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी चा संप असल्यामुळे राज्यातील 250 आगारांपैकी 119 आगार रविवारी बंद होते. विविध मागण्या पुणं करण्यासाठी एसटी च्या कर्मचाऱ्यांनी दोनदिवसाचे उपोषण केले होते.ते मागण्या पूर्ण झाल्यामुळे संप मागे घेतला न्यायालयाने विलीनीकरणाच्या मागणीला अमान्य केल्यावर राज्यात अद्याप संप सुरु आहे आणि या संपामध्ये 119 आगार बंद ठेवण्यात आले. या आगारातून वाहतूक होत नाही .
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत 8 नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होण्याचे सांगण्यात आले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवाब मलिक यांनी 'पुरावे 'दाखवत समीर वानखेडे यांना विचारले -आपली मेहुणी देखील ड्रग्जच्या व्यवसायात सामील आहे का ?