Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा औरंगाबाद येथे

छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा औरंगाबाद येथे
, शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (09:42 IST)
औरंगाबाद येथील क्रांती चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या अश्वारूढ पुतळा 21 फुटी असून या पुतळ्याची पूर्ण उंची 52 फूट आहे. या पुतळ्याचे वजन 7 मेट्रिक टन असून पुतळ्यासाठी ब्रॉन्झ धातूचा वापर करण्यात आला आहे. पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची 31 फूट तर चौथऱ्यासह पुतळ्याची उंची 52 फूट आहे. हा चौथरा आर सीसी ने बांधला गेला असून त्याच्या भोवती स्टोन क्लन्डिंग केले आहे. याचा भोवती 24 कमानीत 24 मावळ्यांच्या प्रतिकृती बसविल्या आहेत. याच्या भोवती कारंजे तयार करण्यात आले आहे. हत्तीच्या सोंडेतून कारंजा सदृश्य पाण्याच्या फव्वारे सोडले आहे. काल रात्री या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवजयंती : शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरची नवी रहस्यं कोणती आहेत?