Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 3 March 2025
webdunia

चंद्रपुरात तीन वर्षात 11 जणांना मारणाऱ्या वाघिणीला अखेर पकडले

tiger
, रविवार, 29 सप्टेंबर 2024 (16:09 IST)
चंद्रपुरात तीन वर्षात उच्छाद मांडणाऱ्या एका वाघिणीला वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पिंजऱ्यात पकडण्यात यश आले आहे. या वाघिणीने 3  वर्षात 11  जणांचा बळी घेतला होता. स्थानिकांमध्ये दहशत माजविणाऱ्या या वाघिणीला जेरबंद केल्या नंतर स्थानिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
 
वनविभाग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, -83 या वाघिणीला शनिवारी सकाळी जनाला परिसरातील कंपार्टमेंट क्रमांक 717 मधून बेशुद्ध करून पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. 
ही वाघीण गेल्या 3  वर्षांपासून मोकाट फिरत होती. तिला अनेकदा पकडण्याचा प्रयत्न केल्यावर देखील ती पकडण्यात येत नव्हती. 

मात्र या वेळी वनविभागाच्या पथकाने तिला जेरबंद करण्याची तयारी कर्ली असून पथकात पशुवैद्यकाचा समावेश असून अनुभवी कर्मचारी देखील होते. 

आधी या वाघिणीला पकडण्यासाठी तिला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन दिले नंतर पिंजऱ्यात बंद केले. तीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर या धोकादायक वाघिणीला जेरबंद करण्यात यश मिळाले ही मोठी दिलासादायक बाब असल्याचे चंद्रपूर जिल्ह्याचे वरिष्ठ वन अधिकारी म्हणाले. 
 
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपुरात आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू