वाढदिवसाच्या दिवशी काळाने झडप घातली. हिंगोली ते नांदेड मार्गावर एका खासगी शाळेजवळ दुचाकी वाहनाला ट्रकने उडवलं या अपघातात दोघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सतीश संभाजी मोगले आणि अमोल प्रकाश मोगले असे मृत्युमुखी झालेल्या दोघांची नावे आहेत. मसोड ला राहणारे सतीश आणि अमोल हे दोघे मोटारसायकलने सतीश मोगलेचा वाढदिवस असल्यामुळे 14 डिसेंबर रोजी कळमनुरी केक आणायला गेले.
घरी परत येतांना काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि हिंगोलीहून नांदेड कडे जाणाऱ्या भरधाव ट्रक ने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात ते दोघे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दोघांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. सतीशच्या वाढदिवसायाच्या दिवशीच त्याच्या आकस्मिक मृत्यूने घरात शोककळा पसरली. दोघांच्या अपघाती मृत्यूनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.