Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विठ्ठल कारखाना यंदा सुरू होणार

विठ्ठल कारखाना यंदा सुरू होणार
पंढरपूर , मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020 (14:06 IST)
वेणूनगर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना जो गतहंगामात बंद राहिला होता तो या 2020-21 च्या गळितासाठी सज्ज असून गुरुवार 8 ऑक्टोबर रोजी बॉयलर अग्निप्रदीपन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली चालविला जात असून मागील हंगामात तालुक्यातील काही कारखाने बंद राहिले होते. यात विठ्ठलचाही समावेश होता. यामुळे यंदा सार्‍यांचे लक्ष या कारखान्याकडे होते. गुरुवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी या कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संचालक भगीरथ भालके व त्यांच्या पत्नी प्रणिता भालके यांच्या हस्ते होत असून अध्यक्षस्थान ह.भ.प. किरण महाराज बोधले हे भूषविणार आहेत. यावेळी मर्चंट बँकेचे माजी अध्यक्ष संजय देविदास भिंगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक आर.एस. बोरावके यांनी दिली.

कारखान्याने हा गळीत हंगाम यशस्वी करण्याची सर्व तयारी अध्यक्ष आमदार भालके व उपाध्यक्ष लक्ष्मण पवार व संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Flipkart चा बहुप्रतिक्षीत ‘बिग बिलियन डेज सेल’ 16 ऑक्टोबरपासून सुरु : जाणून घ्या ऑफर्स