शब्द दिला होता मात्र पाळला नाही, मुख्यमंत्री शिवसेनेचा : उद्धव ठाकरे

शनिवार, 9 नोव्हेंबर 2019 (09:33 IST)
शिवसेना आणि भाजपा मध्ये जोरदार सत्ता संघर्ष असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री बनले आहे. उद्धव ठाकरे यांनी आता माध्यमांसमोर येते आपली भूमिका मांडली असून, भाजपवर जोरदार टीका केली आहे. प्रथम  शिवसेना प्रमुख्यांच्या कुटुंबावर खोटारडेपणाचा आरोप झाल मात्र जनता पुरेपूर ओळखून आहे खरे कोण बोलतो आणि खोटे कोण? आमच्यात काय ठरले होते. मी दिल्लीला गेलो नव्हतो. अमित शहा आले होते. फोनवर चर्चेवेळी त्यांनी सांगितले की, तुम्हाला लोकसभेला युतीच्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद मिळेल. मी त्यांना सांगितले की त्यासाठी मी लाचार नाही. मी माझ्या वडिलांना वचन दिले आहे. यावर त्यांनी म्हटले की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री. तेव्हाही मी नाही म्हणालो. कारण मारामाऱ्या होतात, वाद होतात. यानंतर शहा मातोश्रीवर आले, माझ्या काळात हे नाते बिघडले माझ्याच काळात दुरुस्त करायचे आहे असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री वाटप मान्य केले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मान डोलवली. असे उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
 
उद्धव ठाकरे यांच्या परिषदेतील प्रमुख गोष्टी :
जे जमतं ते मी करेन तेच मी बोलेन, जे जमणार नसेल ते मी वेळ मारून नेण्यासाठी खोटं बोलणार नाही कारण मी भाजपवाला नाही आहे.
महाराष्ट्राच्या जनतेचा शिवसेनाप्रमुखांच्या परिवारावर जेवढा विश्वास आहे तेवढा अमित शहा आणि कंपनीवर नाही
हिंदुत्त्वाचा बुरखा घालून एखादा पक्ष खोटं बोलत असेल तर असे हिंदुत्त्व चालतं तुम्हाला
1999 साली भाजपने शिवसेनेसोबत येण्यास नकार दिला होता. त्यानंतर महिनाभराने आघाडीने
महाराष्ट्राच्या जनतेने ठरवावं की खरी बोलणारी लोकं हवी की खोट बोलणारी लोकं हवी. आमच्या घराण्याने कधीही खोटं बोलून काम केलेलं नाही. खोटं बोलणं आमच्या रक्तात नाही
मला आता संघाला विचारायचं आहे की खोटं बोलणारी माणसं तुम्हाला कशी चालतात. असा खोटारडेपणा हिंदुत्त्वात खपवून घेतला जात नाही.
लोकसभेच्या वेळी जे ठरलेलं त्यापेक्षा अधिक एका सुईच्य़ा टोकाइतकंही मला नको
मी शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
370 कलम काढल्यानंतर त्यांचं उघड उघड अभिनंदन करणारं मी होतं
दुष्यंत चौटाला आणि उदयनराजे यांनी खालच्या थरावर जाऊन मोदींवर टीका केली त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करता याचं मला आश्चर्य वाटतं
मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं आहे की मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचा माणूस मुख्यमंत्री म्हणून बसलेला दाखवीन आणि ते मी पाळणार म्हणजे पाळणारच. त्याच्यासाठी मला अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीची किंवा त्यांच्या आशीर्वादाची गरज नाही.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख शेवटी सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र