गेल्या काही महिन्यांपासून मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) मोठमोठे खड्डे झाल्यानं अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या आहे. त्यामुळं या महामार्गाचं काम कधी होणार, असा प्रश्न सातत्यानं उपस्थित होत होता. याशिवाय सध्या पावसाळा सुरू असल्यानंही वाहनचालकांना या महामार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच गणेशोत्सवात वाहतूक सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान महामार्ग पोलिसांसमोर असतानाच या महामार्गासंदर्भात विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांनी महत्वाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. होती, परंतु आता या महामार्गाबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी मोठी घोषणा केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत आज विधानसभेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान मंत्री रविंद्र चव्हाण यांनी येत्या गणेशोत्वाआधी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करणार असल्याची घोषणा केली, याशिवाय २०२३ च्या आधी या महामार्गाचं काम पूर्णत्वास नेण्याचंही आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्यामुळं आता मुंबई-गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे