भाजप आणि मनसे एकत्र आले तर भाजपचं नुकसानच होईल, असं मत आयपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) समर्थनार्थ रामदास आठवले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी रामदास आठवले यांनी भाजप-मनसे युतीवर भाष्य केलं .
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुप्त भेट झाल्यानंतर भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर भाजप आणि मनसे नेते या युतीच्या समर्थनार्थ वक्तक्य करत आहेत. एकीकडे ‘महाराष्ट्राच्या राजकारणात बेरीज महत्त्वाची, हे आपलं वैयक्तिक राजकीय निरीक्षण’ असल्याचं ट्वीट मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केलं. तर भाजप नेते रावसाहेब दोनवे यांनीही भापज-मनसे युतीचे संकेत दिले. “भाजप आणि मनसेची विचारसरणी वेगळी आहे. जर मनसेने त्यांच्या भूमिकेत काही बदल केला तर भविष्यात काही होऊ शकतं”, असं रावसाहेब दानवे म्हणाले होते.