राज्यात कोरोनाचा धोका कमी झाला तरी परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. जागतिक पातळीवर नवीन व्हेरिएंटचा फैलाव होत आहे. उद्या पंतप्रधानत मुख्यमंत्र्यांची व्हीसी घेणार आहेत. काही बंधनं आणावी लागतील, अशी स्थिती आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावेळी त्यांनी पुन्हा निर्बंध लागू होण्याचे संकेत दिले आहेत.
राज्यात निर्बंधाबाबत विचारण्यात आल्यावर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेणार असल्याचेही अजितदादांनी स्पष्ट केले.
जागतिक पातळीवर चिंतेचा विषय ठरलेल्या ओमिक्रॉन व्हायरसबाबतही अजित पवारांनी खुलासा केला. या व्हायरसबाबत तज्ज्ञांनी वेगवेगळे मत मांडले आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्रीच घेतील असे त्यांनी सांगितले. काही तज्ज्ञांनी राज्यात पुन्हा निर्बंध लावण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेत होणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतरच याबाबतची पुढील दिशा ठरेल असेही ते म्हणाले.
दरम्यान, भारतातही निर्बंध येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.