Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जगताप कुटुंबीयात कुठलाही संघर्ष नाही, विजय १०० टक्के भाजपचा होणार: महाजन

girish mahajan
, शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 (22:10 IST)
कसबा आणि चिंचवडची दोन्ही नाव जाहीर झाली आहे. त्यामुळं आम्ही विधानसभा पोटनिवडणुकीच्या कामाला लागलो आहोत. तिकीट जाहीर झाल्यानं चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना भेटण्यासाठी आलो. कसब्यामध्येही जाणार आहे, असं मंत्री गिरीश महाजन  म्हणाले. चिंचवड हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं विजय मिळेल की, नाही हा विषयचं होऊ शकत नाही. विजय हा १०० टक्के भाजपचा होणार आहे, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. 
 
शंकर जगताप यांची तीन-चार वेळा या आठवड्यात भेट झाली. जगताप कुटुंबीयात कुठलाही संघर्ष नाही. जगताप कुटुंबीयांच्या घरात चांगलं वातावरण आहे. एकत्र कुटुंब पद्धतीने ते राहतात. लक्ष्मण जगताप असताना असलेली परिस्थिती आजही आहे. त्यामुळं शंकर जगताप यांच्याकडे निवडणुकीची धुरा दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी तसं जाहीरही केलं आहे, असंही गिरीश महाजन म्हणाले.
 
शंकर जगताप यांच्या बोलण्यात कुठही काही नाही.सगळे जोरात प्रचाराला कामाला लागतील. आम्ही निश्चित प्रयत्न करत आहोत. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. तशी प्रथा परंपरा आहे. मुंबईतील जागा शिवसेनेची (ठाकरे गट) असल्यानं आम्ही तिथं उमेदवार उभा केला नव्हता, याची आठवणी गिरीश महाजन यांनी करून दिली.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

6 फेब्रुवारीला काँग्रेसकडून आंदोलन, एसबीआय व एलआयसीच्या कार्यालयांसमोर आंदोलन करणार