Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे हे 11 आमदार होणार मंत्री

eknath shinde
, रविवार, 8 डिसेंबर 2024 (15:56 IST)
महाराष्ट्रात देवेंद्र फड़णवीसांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारची स्थापना झाली असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आहे. सरकार स्थापने नंतर आता मंत्रिमंडळ स्थापनेची प्रक्रिया तीव्र झाली आहे. मंत्रिमंडळात शिवसेना शिंदे गटाचे 11 आमदार मंत्री होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

राज्य मंत्रिमंडळात समावेशासाठी शिवसेनेने आपल्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्र्यांची यादी तयार केली आहे.  या यादीत दोन माजी मंत्र्यांचे नाव वगळून दोन नविन चेहरे येण्याची शक्यता आहे. 
माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या दोन माजी मन्त्रींच्या जागी 5 नवे आमदार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे मंत्रिपदाचे दावेदार भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.

महायुतीत शिवसेनेला 13 ते 14 मंत्रीपदे मिळतील, असे मानले जात आहे. त्यापैकी 10 ते 12 मंत्री या आठवड्यात शपथ घेणार आहेत. 

गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर, भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक,अर्जुन खोतकर, विजय शिवतारे इत्यादि मंत्र्यांचा या यादीत समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील एकूण 43 आमदार मंत्री होऊ शकतात. 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रीलंकेच्या नौदलाने आठ भारतीय मच्छिमारांना पकडले, नौका जप्त