Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओमायक्रॉन रुग्ण आढळल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात आजपासून हे 4 निर्बंध लागू

ओमायक्रॉन रुग्ण आढळल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात आजपासून हे 4 निर्बंध लागू
, शनिवार, 25 डिसेंबर 2021 (08:28 IST)
ओमायक्रॉन रुग्ण आढळल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात  हे 4 निर्बंध लागू करण्यात आले आहे. अहमदनगर येथे दोन रुग्ण नुकतेच आढळून आले असून त्यामुळे जिल्हधिकारी यांनी हे बंधन टाकले आहेत.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर, साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन अहमदनगर जिल्ह्यात खालीलप्रमाणे निर्बध दि.25/12/2021 पासून लागू करीत आहे.
 
1) अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, खाजगी आस्थापना/कार्यालये,
व्यावसायिक व औदयोगिक आस्थापना, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, नाट्यगृहे, सिनेमागृह,
लॉन्स, मंगल कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर समारंभ, मेळावे व तत्सम सर्वच
सार्वजनिक ठिकाणी व कार्यक्रमात “No Vaccine No Entry” याप्रमाणे निबंध लागू करीत आहे.
 
2) वरीलप्रमाणे प्रत्येक आस्थापना यांनी त्यांचे कार्यस्थळी येणा-या नागरिकांना कोविड
प्रतिबंधात्मक लसीकरणाची किमान एक मात्रा घेतल्याची खात्री करणे बंधनकारक राहील. व
याशिवाय प्रवेश देणे प्रतिबंधित राहील.
 
3) कोविड-19 विषयक मार्गदर्शक सूचना, निर्देश आणि कोविड अनुरूप वर्तन (Covid Appropriate
Behaviour) चे तसेच राज्य व केंद्र शासन निर्णयातील अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करणे
बंधनकारक राहील.
 
4) वरील ठिकाणी प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीने योग्य पध्दतीने मास्क परिधान करणे, नाक व
तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे.
वरीलप्रमाणे सर्व संबंधितांनी कोविड-19 विषयक मार्गदर्शक सूचना, निर्देश आणि कोविड
अनुरूप वर्तन (Covid Appropriate Bahaviour) चे तसेच वरीलप्रमाणे शासन निर्णयातील अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील. यासंदर्भात कोणतेही उल्लंघन दिसून आल्यास शासन आदेश दि.27/11/2021 मध्ये नमूद केलेप्रमाणे शास्ती करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'त्या' अर्भक मृत्यूप्रकरणाची फौजदारी चौकशी करा : आशिष शेलार