Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदींना दोन तासही झोपू द्यायचं नाही असं 'या' नेत्यांनी ठरवलंय- संजय राऊत

मोदींना दोन तासही झोपू द्यायचं नाही असं 'या' नेत्यांनी ठरवलंय- संजय राऊत
, मंगळवार, 22 मार्च 2022 (11:11 IST)
मोदी साहेब खूप काम करतात, ते फक्त दोन तास झोपतात हा चांगला प्रयोग आहे. आता उरलेले दोन तास सुद्धा त्यांना झोपू द्यायचं नाही असं बहुतेक महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी ठरवलेले आहे. त्यानुसार भाजपाचे नेते कामाला लागले आहेत, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 22 तास काम करतात, दोन तास झोपतात. आता तर ते दोन तासही झोप येऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहेत, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.
 
त्यांच्या या विधानावर संजय राऊत यांनी उपहासात्मक टिप्पणी केली आहे. तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी नागपुरात बोलताना चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर भाष्य केलं.
 
विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेनेचे सर्व खासदार तीन दिवस विदर्भात राहणार आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'पंतप्रधान वाराणसीतून निवडणूक लढवू शकतात, तर मी आसनसोलमधून का नाही?'