Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दानपात्रातून एक लाख रुपये चोरले, ठाण्यातील घटना

Thieves stole one lakh rupees from the donation box
, शुक्रवार, 21 जून 2024 (16:51 IST)
ठाण्यात मीरा रोडच्या मारुती मंदिरात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून दानपत्रातून एक लाख रुपये चोरण्याची घटना घडली आहे. ही घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 
 
सदर घटना ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरातील एका हनुमान मंदिरातील असून बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास तीन जण मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात शिरले आणि त्यांनी दानपत्राचे कुलूप तोडून एक लाख रुपयाची रोख रक्कम चोरून नेली. 

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. सकाळी मंदिराच्या पुजाऱ्यांनी आल्यावर मंदिराचे आणि दानपत्राचे कुलूप तोडलेले दिसले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला.

या तक्रारीवरून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.    
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लक्ष्मण हाके उपोषणावर ठाम, ओबीसींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार