Marathi Biodata Maker

हे गद्दार सरकार असून कोसळणारच : आदित्य ठाकरे

Webdunia
बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (15:04 IST)
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘५० खोके, गद्दार हाय हाय’ अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटातील सत्ताधारी आमदारांना लक्ष्य केलं. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला आहे.
 
विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा देणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेदेखील सहभागी झाले होते. गद्दारी करुन राज्यात सरकार आल्याचे पोस्टर यावेळी झळकावण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरेंनी आम्ही गद्दार सरकारचा विरोध करत असल्याचं म्हटलं. “ज्यांनी लोकशाहीचा खून केला त्यांच्याविरोधात आम्ही उभे असून, हे गद्दार सरकार असून कोसळणारच,” असा दावा आदित्य ठाकरेंनी केली. हे सरकार घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि बेईमानांचं सरकार असून नक्की कोसळणार असंही ते म्हणाले.
 
“महाराष्ट्राच्या संस्कृतीत, राजकारणात याआधी गुंडगिरीची भाषा वापरली जात नव्हती. ज्या नव्या पक्षात ते जाऊ इच्छित आहेत, तिथे ही भाषा मान्य आहे का?,” अशी विचारणा यावेळी आदित्य ठाकरेंनी केली. “मुख्यमंत्री किंवा खरे मुख्यमंत्री यांचा अंकुश राहिला नसल्यानेच गुंडगिरीची भाषा वापरली जात आहे,” असं आदित्य म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: नाशिक पोलिसांनी नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेतले

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १७ रिक्त जागांसाठी निवडणुका पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, पुढील आठवड्यात प्रचारमोहीम सुरू होण्याची संभावना

बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांना जीवे मारण्याची धमकी; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : धावत्या ट्रेनमध्ये गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिला; रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या प्रसंगावधानामुळे आनंदाचे वातावरण

नाशिकच्या एका छापखान्यातून 'पेपर गेम' सुरू झाला! फुटलेली नीट प्रश्नपत्रिका लाखो रुपयांना विकली गेली

पुढील लेख