मनमाड पासून जवळच असलेल्या नागापूर ग्रामपंचायतीची निवडणूकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र पवार हे थेट सरपंचपदी ९०३ मते घेऊन विजयी झाले आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक पवार तर रघुनाथ सोमासे यांचा पराभव झाला. इंधन कंपन्यांच्या मालमत्ता करापोटी वार्षिक कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न या ग्रामपंचायतीला मिळते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मोजक्या श्रीमंत ग्रामपंचायतींपैकी एक नागापूर ही ग्रामपंचायत आहे. त्यामुळे येथील निवडणूक राज्यभर चर्चेत होती. या ग्रामपंचायतीचा निकाल अखेर लागला आहे.
विशेष म्हणजे या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार हे स्वतः सरपंचपदाच्या निवडणुकीत होते. तर त्यांच्या पॅनल विरोधात त्यांचेच बंधू माजी आमदार संजय पवार यांचे पॅनल उभे होते. त्यामुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेची ठरली. रविवारी या नागापूर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासह सर्व सदस्यांसाठी रविवारी मतदान झाले. या ग्रामपंचायतीवर ताबा मिळविण्यासाठी तिरंगी लढत झाली. दोन्ही पवार बंधूंव्यतिरीक्त तिसरे पॅनलही येथे होते. त्यामुळे येथे कोणाच्या हाती सत्ता जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
नांदगाव तालुक्यात थेट सरपंचपदी निवड झालेले उमेदवार असे
– बोयेगाव – बबन पोपट शेरमाळे
– लोढरे -ज्योती प्रमोद निकम .(शिंदे गट)
– हिरेनगर – मंगला श्रावण बिन्नर (शिंदे गट)
– धोटाने खुर्द – शरद अशोक काळे
– लक्ष्मीनगर – मीराबाई शंकर उगले
– भार्डी – अनिता अशोक मार्कंड
– हिसवळ – शांताराम पवार
– मुळडोंगरी – जन्याबाई पवार
– धनेर – मनीषा वाघ
-पिंपखेड – जीवन गरुड
– तळवाडे – शीतल निकम
Edited By - Ratnadeep Ranshoor