Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

असे दिले आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण

असे दिले आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण
, सोमवार, 22 मार्च 2021 (15:50 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत वाझे-देशमुख यांच्या भेटीचे आरोप खोटे आहेत. अनिल देशमुख ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीपासून रुग्णालयात होते. त्यानंतर १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी पर्यंत होम क्वारंटाईन होते, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या पत्रकार परिषदेचं ट्विट रिट्विट करत पवारांच्या म्हणण्यानुसार देशमुख क्वारंटाईन होते मग पत्रकार परिषद कोणी घेतली? असा सवाल केला. या सगळ्यावर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
 
मला कोरोना झाल्याने नागपूरच्या अलेक्सिस रुग्णालयात ५ फएब्रुवारी ते १५ फेब्रुवारीच्या दरम्यान तिथे रुग्णालयात होतो. १५ फेब्रुवारीला मला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडत असताना अनेक पत्रकार उभे होते. त्यांना काही प्रश्न विचारायचे होते. त्यावेळेस मी नुकताच कोरोनातून बाहेर आलो होतो. माझ्या अंगात त्राण नव्हता. त्यामुळे मी रुग्णालयाच्या तिथेच गेटवर खूर्चीवर बसलो आणि पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देत मी गाडीत बसलो. त्यानंतर १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी पर्यंत होम क्वारंटाईन होतो. त्यानंतर २८ फेब्रुवारीला मी घराच्या बाहेर पडलो. सह्याद्री गेस्ट हाऊसला मी बैठकीला गेलो, असं स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिलं.
 
अनिल देशमुख यांनी लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या शेतकरी आंदोलनावरील ट्विटसंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. याबाबतचं ट्विट अनिल देशमुख यांनी केलं होतं. हेच ट्विट रिट्विट कर फडमवीस यांनी सवाल केला आहे. “१५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असं पवार साहेब सांगतात. पण, १५ ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रकार परिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना लॉकडाऊन: नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन लावताना कुणाशी चर्चा केली होती का? - बीबीसी स्पेशल रिपोर्ट