प्रसिद्ध आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा कोविड नियमांचे पालन करून होणार आहे. यासंदर्भात नियोजन झाले आहे. दोन डोस घेतलेल्यांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
आंगणेवाडी देवस्थानचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी, यात्रोत्सवाच्या नियोजनासंदर्भात बैठक झाली. भाविकांना अगदी सुलभतेने दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था केली जाईल. सर्व भाविकांना दर्शन घेता येईल. आंगणे कुटुंबीयांकडून भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
'अशी' आहे नियमावली
- कोकणातील आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा २४ फेब्रुवारीला
- कोविड नियमांचे पालन करून यात्रा होणार
- दोन डोस घेतलेल्या भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश
- कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करूनच ही यात्रा होणार आहे.
- व्यापाऱ्यांसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत.
- स्टॉलची संख्या कमी करण्याचा निर्णय