Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात असा होणार विमान सेवेचा विकास, बैठकीत झाले हे निर्णय

राज्यात असा होणार विमान सेवेचा विकास, बैठकीत झाले हे निर्णय
, सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (21:41 IST)
राज्यातील विमानतळांच्या समस्या सोडविणे व विकास करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरने निवेदनाद्वारे केलेल्या सुचनाबाबतही सकारात्मक विचार करून अंमलबजावणी करण्यात येईल व राज्यातील विमानसेवांचा कालबद्ध विकास केला जाईल अशी ग्वाही महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे व्हाईस चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर यांनी दिली.
 
महाराष्ट्र राज्यातील विविध शहरांतील विमानतळांचा विकास व नवीन सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी चे व्हाईस चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर यांच्या समवेत वर्ल्ड ट्रेड सेन्टर मधील कार्यलयात झालेल्या संयुक्त बैठकित सहभाग घेतला. याप्रसंगी प्रास्तविक करताना विमानतळांच्या समस्या सोडविणे व विकास करणे यासाठी महाराष्ट्र चेंबरची सिविल एव्हिएशन समिती संपूर्ण सहयोग असे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे व्हाईस चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
 
चर्चेप्रसंगी अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रामुख्याने कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र , कोकण , विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या विभागातील शेतमालाला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय माल वाहतूक विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली. कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण गतीने पूर्ण कर-ण्याची मागणी केली. औरंगाबाद विमानतळावरून नवीन रूट सुरू करणे, जळगाव विमानतळावरून विमान सेवा वाढवून मालवाहतूक सेवा सुरु करणे, नाशिक विमानतळावरील सुविधा वाढवणे अश्या विविध मागण्याचा अभ्यास अहवाल सादर करून झपाट्याने वाढणाऱ्या प्रवासी व माल वाहतुकीकरिता जिल्हास्तरावर विमानतळ विकास प्राधिकरण व महाराष्ट्र चेंबरच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण केंद्र उभारून युवकांना विमानसेवेशी निगडित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले.
 
राज्यातील जिल्ह्यांना शहरासाठी जोडण्यासाठी नवीन हवाई मार्ग व विमानसेवा सुरू करण्याच्या सूचना वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी केली. चेंबरच्या सिविल एव्हिएशन समितीचे सुनीत कोठारी यांनी या प्रसंगी विमान सेवा पुरवणाऱ्या कंपनांच्या इंधनाचा मूल्य वर्धित करा मध्ये कपात करून तो १ टक्के करावा असे सुचविले. याप्रसंगी दिपक कपूर यांनी विमानतळ विकास प्राधिकरनाच्या विविध विकास कामांची माहिती दिली. त्यात प्रामुख्याने कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरनासाठी केलेले प्रयत्न व महाराष्ट्र सरकारने केलेल्या अर्थसहायातून येणाऱ्या तीन ते चार महिन्यात कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी 64 हेक्टर जमिनीचे भूसंपादन पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती शिष्टमंडळाला दिली. विमानतळ प्राधिकरण हे लवकरच अमरावती आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील विमानतळाच्या विकास कामाला सुरुवात करणार असून नोव्हेंबर 2022 ला अमरावती विमानतळावरून पहिले उड्डाण करण्याचे उद्धिष्ट असल्याचे दीपक कपूर यांनी सांगितले.  शिष्टमंडळात वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करूनाकर शेट्टी, उपाध्यक्ष सौ शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र माणगवे, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, सुनीत कोठारी, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे होते.
 
 बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय असे
– कोल्हापूर विमानतळासाठी लागणारा निधी महाराष्ट्र सरकार कडून मंजूर केला जाणार.
– रत्नागिरी विमानतळासाठी लागणारा निधी महाराष्ट्र सरकार कडून मंजूर केला जाणार आहे.
– शिर्डी येथे स्वतंत्र कार्गो टर्मिनल उभारणार
– अमरावती येथील विमानतळासाठी भारत सरकारकडून ५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून पहिल्या टप्प्यातल्या ६.५ कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच अमरावती विमानतळासाठी महाराष्ट्र सरकारकडून अतिरिक्त २३ कोटी मिळणार असल्याचे दिपक कपूर यांनी सांगितले.
– नोव्हेंबर २०२२ पासून अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत जाहीर करण्यात आला.
– पुणे शिर्डी नागपूर विमान सेवा १८ फेब्रुवारी २०२२ पासून अलाइन्स एअर सुरु करणार
– पुणे औरंगाबाद नागपूर सेवा 1 मार्च पासून सुरू होणार
– विमानसेवा विस्तारीकरणासाठी सर्व विमान कंपनी व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स बरोबर येत्या महिन्यात बैठक घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
– महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरनाने सुरू केलेल्या शिर्डी व नागपूर मालवाहतूक सेवेला मिळणारा प्रतिसाद व तेथील शेतकऱ्यांना होणारा फायदा याची सविस्तर माहिती दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भयंकर, मृतदेहाला लागल्या मुंग्या, रूग्णालयाने दिले 'हे' स्पष्टीकरण