Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वतःला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवणाऱ्यांना जनतेचा आवाजच ऐकू येत नाही

स्वतःला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवणाऱ्यांना जनतेचा आवाजच ऐकू येत नाही
, शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (08:21 IST)
साकीनाका येथील बलात्काराच्या घटनेनंतर राज्यात महिला अत्याचाराच्या घटना एका मागोमाग एक समोर येत आहेत. डोंबिवली, कल्याण नंतर आता महाबळेश्वरमध्येही अशीच घटना घडल्याचं समोर आलं आहे.त्यावरुन भाजप (BJP) कमालीचा आक्रमक झाला आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
 
ट्विटरवर चंद्रकांत पाटील म्हणाले, कल्याणमध्ये अवघ्या 8 वर्षाच्या मुलीवर तर महाबळेश्वरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे.मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना माझे एकच सांगणे आहे.ही वेळ गायब होण्याची नव्हे, तर अत्याचाराचे हे दृष्टचक्र थांबवण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची आहे.
 
आपल्या माता-भगिनींवर ही वेळ ओढवलेली असताना कुठला कुटुंबप्रमुख इतर राज्यांमधली परिस्थिती दाखवेल ? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

स्वत:ला महराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या दीड वर्षापासून दुर्दैवाने जनतेचा आवाजच ऐकू येत नाही,असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डोंबिवली सामूहिक बलात्काराचा खटला जलदगती न्यायालयात चालविणार : एकनाथ शिंदे