Publish Date: Tue, 11 Feb 2025 (17:17 IST)
Updated Date: Tue, 11 Feb 2025 (17:24 IST)
देशात वाढत्या रस्ते अपघातांमुळे सरकार, प्रशासन आणि जनता चिंतेत आहे. हे अपघात रोखण्यासाठी विविध उपाय योजना देखील केल्या जात आहे. अपघातांना कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कडून रस्ता सुरक्षा सारख्या मोहिमा राबवल्या जात आहे. तरीही अपघात घडत आहे.
चालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडतात.
10 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या बुटीबोरी येथे रात्रीच्या अंधारात गाडी चालवायला शिकणाऱ्या कार चालकासह तिघांचा सुरक्षे अभावी विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सदर घटना सोमवारी रात्री घडली.तीन तरुण एका कार मधून रात्री11 ते 11.30एमआयडीसीकडे जात होते. गाडी चालवायला शिकत असताना कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन कच्च्या विहिरीत पडली.
वाहनातील तिघांचा अडकून मृत्यू झाला. विहीर खोल असल्याने गाडीतील तिघांना बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळतातच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.
या वेळी पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बचाव कार्यासाठी स्थानकांची मदत घेतली. खूप प्रयत्नानंतर गाड़ी विहिरीतून बाहेर काढण्यात यश झाले. तो पर्यंत तिघांचा मृत्यू झाला.तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पोलीस अपघाताचा तपास करत आहे.