Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जुना वाडा कोसळल्याची घटना तीन महिन्याचं बाळ वाचलं..!

जुना वाडा कोसळल्याची घटना तीन महिन्याचं बाळ वाचलं..!
, शनिवार, 29 जानेवारी 2022 (21:57 IST)
नाशिक शहरातील भद्रकाली येथील तलावडी भागात एक जुना वाडा कोसळल्याची घटना घडली.  सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र चमत्कारिक गोष्ट घडली आहे,
सदर वाडा हा पिंपळ चौकातील संजय परदेशी यांच्या मालकीचा असून त्यांच्या जुन्या वाड्याची भिंत कोसळली. यावेळी वाड्याच्या मागील राहणाऱ्या परवेज मेमन यांच्या भाडेकरूंच्या घरांवर कोसळली. यामध्ये चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहे. जखमींमध्ये एक महिला आणि तीन नागरिक असून एक तीन महिन्याचे बालक बालबाल बचावले आहे. जखमींमध्ये रिजवान अब्दुल, रहमान पठान, अजित सय्यद, प्रमोद दोरगे, सलीम शेख, अत्तर व इतर कारागीर होते. घटनेची माहिती कळताच भद्रकाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार आणि त्यांची बीट मार्शल टीम व पथक पोलीस नाईक कोळी पोलीस नाईक काटे, बीट मार्शल चे हसे, बीट अंमलदार समाधान जाधव व सांधे व इतर उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पोलीस महिला अंमलदार यांना ८ तासांची ड्युटी, पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा आदेश