Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रातील तीन विद्यालयांची स्वच्छ विद्यालय पुरस्कारांसाठी निवड

school reopen
, सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (21:35 IST)
स्वच्छ विद्यालयांसाठी ठरवून दिलेल्या विविध मानकांवर पात्र ठरणा-या महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना वर्ष 2021-22 च्या ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने  ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कारा’ चे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह यांच्यासह केंद्रीय शिक्षण विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
महाराष्ट्रातील तीन विद्यालयांची निवड स्वच्छ विद्यालय पुरस्कारांसाठी करण्यात आली यामध्ये सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील ओझरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, याच जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाटण व्हॅली इंग्ल‍िश मिडीयम स्कूल आणि रायगड जिल्ह्यातील खारघर येथील रामशेठ पब्ल‍िक स्कूल या विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रातिनिध‍िक म्हणून त्या-त्या शाळेंचे विद्यार्थीही पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्राचार्यांसोबत उपस्थित होते. या पुरस्कारातंर्गत विद्यालयांचे सहा मानकांवर मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये पाणी, शौचालय, हाथ धुण्यासाठी साबण, संचालन व देखभाल, व्यवहार परिवर्तन व क्षमता निर्माण आणि कोविड-19 च्या काळातील तयारी व प्रतिक्रिया या आधारावर विद्यालयांचे मुल्यांकन झाले.
 
केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे वर्ष 2016-17 पासून स्वच्छता विद्यालय पुरस्कारांची सुरूवात करण्यात आली. वर्ष 2021-2022 च्या स्वच्छ विद्यालय पुरस्कारांसाठी देशभरातील एकूण 39 शाळांची निवड झाली. यामध्ये सर्वसमावेशक श्रेणीमध्ये 34 विद्यालयांची निवड तर उपश्रेणींमध्ये 5 विद्यालयांची निवड करण्यात आली. या अंतर्गत 17 प्राथमिक आणि 22 माध्यमिक/उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे. तसेच निवड झालेल्या विद्यालयांमध्ये 21 शाळा ग्रामीण भागातील तर 18 शाळा या शहरी भागातील आहे. या विद्यालयांमध्ये 28 शाळा अनुदान‍ित, 11 शाळा खाजगी, 2 कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय, 1 नवोदय विद्यालय आणि 3 केंद्रीय विद्यालयांचा समावेश आहे. सर्व समावेशक श्रेणीमधील 34 विद्यालयांना 60 हजार रूपये रोख तर उपश्रेणीतील 5 विद्यालयांना 20 हजार रूपये रोख तसेच प्रशस्ती पत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खडसे यांच्या मुलाची हत्या झाली की आत्महत्या आहे? : महाजन