Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युवतीचा विनय भंग करणाऱ्याला तीन वर्षे कारावास 50 हजारांचा दंड

court
, शुक्रवार, 16 जून 2023 (08:06 IST)
ओरोस:एका युवतीचा विनयभंग केल्या प्रकरणी कुडाळ तालुक्यातील पींगुळी शेटकर वाडी येथील सुदाम सुंदर मोरये वय 30 याला सिंधुदूर्ग नगरी येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस डी चव्हाण यांनी 3 वर्षे सश्रम कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील नितीन कुंटे यांनी काम पाहिले.
 
कुडाळ तालुक्यातील एका गावातील मुलगी आपले काम आटोपून पाय वाटेने घरी जात असताना ती एकटी असल्याचा फायदा घेऊन आरोपी सुदाम मोऱ्ये याने तिचा विनयभंग केला होता. मे 2018 मध्ये ही घटना घडली होती. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला दोषी धरले आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Asia Cup 2023: आशिया चषक 31 ऑगस्टपासून हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवला जाईल, पाकिस्तानमध्ये चार सामने आणि श्रीलंकेत नऊ सामने