मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र येत्या गुरूवारपासून पुन्हा वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय.
दुसरीकडे, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी मोठा टप्पा पार करत देशाच्या बहुतांशी भागातून माघार घेतलीये. महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह उत्तरेकडील काही भागातूनही पाऊस परतल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं असतानाच आता गुरूवारपासून पुन्हा वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय.
यंदा देशात आठ दिवस उशिरानं दाखल झालेला मॉन्सून महाराष्ट्रात सर्वात उशिरा म्हणजे 20 जून रोजी दाखल झाला होता. आगमनाप्रमाणेच मॉन्सूनच्या परतीचा प्रवासही जवळपास सव्वा महिन्यानं लांबलाय.