Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 24 March 2025
webdunia

नागपुरात शुक्रवारच्या नमाजासाठी कडेकोट बंदोबस्त

mumbai police
, शुक्रवार, 21 मार्च 2025 (13:19 IST)
17 मार्च रोजी नागपुरात हिंसाचार उसळला. या प्रकरणी आता पर्यंत 12 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहे. या प्रकरणी 4 सायबर पोलिसांनी तर 8 स्थानिक पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. 
नागपुरात 17 मार्च रोजी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या नमाजासाठी अनेक मशिदींच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. नागपुरात मध्य नागपुरातील पोलीस ठाण्यातील भागात संचारबंदी लागू आहे. तर दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी काढण्यात आली आहे. काही भागांत 4 तासांची शिथिलता देण्यात आली आहे. 
आज शुक्रवारी रमजानच्या पावित्र्य महिन्यात तिसरी जुमेची नमाज होणार आहे. पुन्हा हिंसाचार होऊ नये या साठी कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.  नागपूर हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत मास्टरमाइंड फहीम खानसह 84 दंगलखोरांना अटक करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Gold Rate Today : आज सोने किती स्वस्त झाले? दहा ग्रॅमची नवीनतम किंमत जाणून घ्या