यवतमाळ :टी1 वाघिणीला जेरबंद करण्यासाठी हैद्राबाद येथील प्रसिद्ध शुटर नवाब शफात अली खान याना वनविभागाने पाचारण करण्यात आले होते. मात्र, वन्यजीव प्रेमी यांनी नवाबला विरोध केल्याने त्याला परत पाटविण्यात आले होते. मात्र पुन्हा आता शूटर नवाबला शनिवार पासून वन विभागाने बोलावून या वाघिणीला पकडण्याची मोहीम हाती देण्यात आली. मात्र ही वाघीण दोन बछड्यांची आई आहे, जर ती मारली गेली तर तिच्या पिल्लांचे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मध्यंतरीच्या ताडोबा येथील गजराज हा हत्ती बेभान झाला होता यामध्ये एका महिलेला मारले होते. त्यामुळे येथील उर्वरित चारही हत्ती परत पाठविले होते. त्यामुळे या T1 वाघिणीला कसे पकडायचे असा प्रश्न निर्माण झाला.आहे नावाब यांनी मला कुठल्याही प्राण्याला किंवा वाघाला मारण्याचा मारल्याने आनंद मिळत नाही उलट त्या भागातील विपरीत परिस्थिती आणि तिथल्या लोकांचं जीवनमान सुरळीत होण्यासाठी तिथली शांतता कायम राहण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात त्यामुळेच वनविभागाने मला इथे पाठवला आहे आणि त्याच दृष्टीने माझे वाघिणी दोन बछड्यांना पकडण्याचे प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.मिशन T1 कॅप्चर मोहीम ही देशातील पहिली मोठी कारवाई आहे ज्यामध्ये एका वेळी तीन वाघांना एकत्र पकडायचा आहे ज्यामध्ये T1 वाघीण आणि तिचे नऊ महिन्यांचे दोन छावे आहे ..