Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

त्या वाघिणीला मोहात पाडणार केल्विन क्लेन परफ्युम स्प्रे, वन विभागाचे अजब डोके

त्या वाघिणीला मोहात पाडणार केल्विन क्लेन परफ्युम स्प्रे, वन विभागाचे अजब डोके
, गुरूवार, 1 नोव्हेंबर 2018 (15:16 IST)
भारतात कोण काय करेल याचा नेम नाही. असाच प्रकार यवतमाळ घडला आहे. आपण अनेक परफ्युम स्प्रे जाहिराती पाहतो त्यात पुरुषाने तो स्प्रे अंगावर लावला की त्याच्या वासाने मादकपणे अनेक स्त्रिया जवळ येतात, असाच प्रकार वन विभाग वाघिणी वर प्रयोग करत आहेत. यवतमाळ जिल्यातील राळेगाव तालुक्यात गेल्या वर्षभरात १४ जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीला पकडन्यासाठी वन विभागाने नवीन अजब क्लुप्ती शोधली आहे. या वाघिणीला पकडण्यासाठी वाघिणीचे मूत्र आणि केल्विन क्लेन परफ्युम स्प्रे केला जाणार आहे. वाघिणीला जेरबंध करा अन्यथा ठार करा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्या नंतर या वाघिणीला पकडण्याची मोहीम तेज करण्यात आली. हैद्राबाद येथील शुटर, त्यानंतर हत्ती, त्यांनतर इटालियन डॉग्स, पॅराग्लाडर, थर्मल ड्रोन हे सगळे प्रयोग केल्यानंतर हि वाघिणी वन विभागाच्या जाळ्यात अडकली नाही. आता या वाघिणीला पकडण्यासाठी महाराज बाग मधील एका दुसऱ्या वाघिणीचे मूत्र तिच्या वास्तव असलेल्या भागात शिंपडण्यात येत आहे. यातून तिला आकर्षित करून तिला तिच्या वावर असलेल्या क्षेत्रातून बाहेर बोलावून ट्रांकुलाईझ करने अशी नवी पद्धत वनविभागाने हाती घेतली आहे. सोबतच या वाघिणीला पकडण्यासाठी केल्विन क्लेन नावाचे सुवाशीत परफ्युम चा सुद्धा वापर केला जात आहे. हे परफ्युम झाडावर किंवा तिच्या वावर क्षेत्रात फवारून तिला आकर्षित केले जाणार असून या दोन्ही क्लुप्त्या चा वापर केला जाणार आहे.
 
या आधी २०१० एका वाघाला पकडण्यासाठी अश्याच पद्धतीने मूत्राचा वापर करण्यात आला होता. त्याला यश देखील आले होते. आता या टी १ वाघिणीच्या भागात अश्याच पद्धतीने मूत्राचा वापर करून या वाघिणीला पकडण्याकरण्यात येणार आहे. या नरभक्षक वाघिणीने काल अंजी परिसरात एका गोऱ्ह्यांची शिकार केली असून गुराख्या च्या डोळ्या देखत वाघिणीने गोऱ्ह्याचा फडशा पाडला युवराज चांदेकर याच्या गोऱ्ह्यांची शिकार या वाघिणीने केली असून या भागात भीतीयुक्त वातावरण सध्या आहे.या नरभक्षक वाघिणीच्या दहशतीमुळे नागरिक भीतीच्या वातावरणात जगत आहेत शेतात जाण्यासाठी नागरिक भीत आहेत उभं पीक असताना शेतात मजुरीला कोणी येत नाही आणि दुपारी ४ च्या आधी शेतातून कामे अर्धवट सोडून परत यावं लागते वनविभाग गेल्या अनेक दिवसापासून या वाघिणीला पकडण्यासाठी नवनवीन प्रयोग करीत असून याचे प्रयोग फसत आहेत. त्यामुळे वनविभाग विरंगुळा करीत असल्याचा आरोप या भागातील गावकर्यांनी केला आहे. या वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाच्या नवनिवन आयडियाच्या कल्पना झाल्या आता नवीन परफ्युम ची आयडिया कितपत यशस्वी होते ? ह्या वाघिणीला कॅमेरात कैद करण्यात वनविभाग यशस्वी झाला मात्र जेरबंद कधी करते हे पाहणे महत्वाचे आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हेज माहित आहे मात्र यापुढचे वेगन डायेट म्हणजे काय आहे