Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आज बाळासाहेब हवे होते, शरद पवारांकडून आठवण

आज बाळासाहेब हवे होते, शरद पवारांकडून आठवण
शरद पवार यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली. “बाळासाहेब ठाकरे हे एक असे नेते होते, ते लहानातल्या लहान समाजातील कार्यकर्त्यांसोबत असायचे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे ज्या समाजातून आले आहेत, त्या समाजाची लोकसंख्या दोन ते तीन हजार पण नाही पण ते खासदार झाले. अशा अनेक समाजातील कार्यकर्त्यांना बाळासाहेबांनी घडवले”, असं शरद पवार म्हणाले.
 
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
webdunia
यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले. “असा प्रसंग यापूर्वी कधी माझ्यावर आला नाही. पवारसाहेबांनी बाळासाहेबांची आणि माँची आठवण काढली. संघर्षाचा विजय मिळाल्यावर मला बाळासाहेबांची आठवण येते. स्वप्नात पण विचार केला नव्हता की मला काहीतरी व्हायचं आहे. सर्वांचे आभार मानताना  सोनिया गांधीना धन्यवाद देईन, तीन टोकाचे तीन पक्ष एकत्र आले आहेत, मात्र एकमेकांवर विश्वास ठेवून आम्ही एकत्र आलो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
 
तीस वर्ष ज्यांच्यासोबत मैत्री ठेवली त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही, पण ज्यांच्यासोबत तीस वर्ष सामना केला त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. नेमकं कमावले काय आणि गमावले काय? याचा विचार करणार नाही. आपण सर्व मैदानातली माणसे आहोत, त्यामुळे आखाड्यात उतरल्याने वेगळे काय वाटत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
 
तीन पक्ष वेगळे म्हणून आमचे तुमचे करायचे नाही, हे आपलं सरकार आहे, सर्वसामान्य जनतेला वाटलं पाहिजे, हे माझं सरकार आहे.
 
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला खूप खिळे असतात, जाणारे मुख्यमंत्री आणखी चार खिळे ठोकून जातात, पण तुम्ही सोबत असाल तर ते खिळे मी हातोड्याने ठोकेन. मी घाबरणारा नाही रडणारा नाही तर लढणारा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
 
‘मातोश्री’त जे आले ते बाहेर जाऊन खोटं बोलतात त्यांची साथ मी कदापी देणार नाही. खोटेपणा माझ्या हिंदुत्वात नाही. शब्द देताना दहा वेळा विचार कर, दिलेला शब्द पडू द्यायचा नाही, असं बाळासाहेबांनी सांगितलं. मला तुमच्या सहकार्याची गरज आहे, शेतकऱ्यांची जी दैना झाली आहे ती मी विसरु शकत नाही, त्यामुळे आपल्याला काम करायचे आहे. कुणी आमच्या आडवे येऊ नका, आडवे आले की आम्ही उत्तर देऊ, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आणि सुप्रिया सुळे धावतच विधानभवनाबाहेर