Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पालकमंत्र्यांच्या नावाने फोन करत फसवणाऱ्या तोतया पीएला अटक..

पालकमंत्र्यांच्या नावाने फोन करत फसवणाऱ्या तोतया पीएला अटक..
, शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (22:49 IST)
नाशिकके पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाने फोन करत ग्रामीण पोलिसांत दाखल असलेल्या एका गुन्ह्यात मदत करण्याची ग्वाही देत आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोतया पीएलाच गुन्हे शाखेच्या पथकाने चार तासांत अटक केली. महेंद्र नारायण पाटील (रा. टकले नगर) असे त्याचे नाव आहे. अंबड पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात माहिती व तंत्रज्ञान कायदा अधिनियम अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात अशाला आहे.
 
पोलिसांनी दिलेली माहिती अणि पालक मंत्री छगन भुजबळ यांचे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महेंद्र पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कासुरे (रा. उगाव, ता. निफाड) या व्यक्तीशी संशयित महेंद्र पाटील याने फोनवर संपर्क साधून पालकमंत्र्यांच्या बंगल्यातून बोलत असल्याचे सांगितले.
 
तुमच्या पत्नीच्या विरोधात निफाड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मदत करण्याचे आश्वासन दिले. कासुरे यांनी महेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधून खात्री केली असता अशा नावाच कोणी साहेबांचा पीएच नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. हा प्रकार लक्षात येताच पवार यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्याची दखल घेत गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील अधिकाऱ्यांनी वेगाने तपास करून तंत्रविश्लेषण शाखेच्या मदतीने संशयिताचा माग काढला. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्याने पालकमंत्र्यांच्या नावाने फोन केल्याची कबुली दिली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सीताराम कोल्हे, अचलानंद वाघ, अजय शिंदे यांच्या पथकाने उपायुक्त संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
 
ऑडिओ क्लिपमुळे प्रकार उघडकीस:
पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक पैठणकर यांच्या मोबाइलवर याबाबतच्या काही आॅडिअो क्लिप आल्या होत्या. त्यात महेंद्र पाटील नावाचा व्यक्ती मी पालकमंत्र्यांच्या बंगल्यातून बोलत आहे. तुमच्या केसमध्ये तुम्हाला मदत करतो. माझे साहेबांशी बोलणे झाले आहे. पोलिस अधीक्षकांशी बोलणे झाले आहे. तुम्ही समक्ष न येता तुमचा माणूस मला भेटायला पाठवा. काय असेल ते करुन घेऊ, असे संवाद या क्लिपमध्ये असल्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी महेंद्र पवार यांना याबाबतची कल्पना दिली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पती उपचारासाठी, पत्नी वडिलांच्या सेवेसाठी गेलेली असताना चोरट्यांचा डल्ला