Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 10 January 2025
webdunia

आठव्या मजल्यावरून पडून तरुणीचा दुर्देवी मृत्यू ,पनवेलची घटना

आठव्या मजल्यावरून पडून तरुणीचा दुर्देवी मृत्यू ,पनवेलची घटना
, मंगळवार, 31 जानेवारी 2023 (14:43 IST)
पनवेल मध्ये आठव्या मजल्यावरून पडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेरी निरीश असे या २० वर्षीय मयत तरुणीचं नाव आहे. 
वृत्तानुसार, मृत तरुणी मेरी ही पनवेलच्या कोनगाव च्या समोर इंडिया बुल्स अस्टर इमारतीत 8 व्या मजल्यावर राहत असून ती अमित युनिव्हर्सिटी फॅशन डिझायनींगच्या दुसऱ्या वर्षात शिका होती. रविवारी तिच्या कडे तिचा मित्र आला होता. रविवारी सकाळी 11 च्या सुमारास ती बाल्कनीमधून खाली पडली. खाली असलेले सुरक्षा रक्षकांच्या आणि नागरिकांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेले असता डोक्याला जबर मार लागून तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पनवेल तालुका पोलिसांत देण्यात आली असून त्यांनी घटनास्थळी येऊन प्रकरणाचा तपास केला तिने आत्महत्या केली अपघात झाला की घात पात याचा शोध घेत आहे. तिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.     
 
Edited By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Dhirendra Shastri :धीरेंद्र शास्त्री लवकरच लग्न करणार!