Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धावत्या ट्रेनमध्ये आणि शौचालयातून ट्रॅकवर पडूनही बाळ सुरक्षित

धावत्या ट्रेनमध्ये आणि शौचालयातून ट्रॅकवर पडूनही बाळ सुरक्षित
, बुधवार, 26 एप्रिल 2017 (12:43 IST)
रत्नागिरीहून दादरला येणाऱ्या धावत्या ट्रेनमध्ये शौचालयात एका महिलेने बाळाला जन्म दिला. विशेष  म्हणजे धावत्या ट्रेनच्या शौचालयातून ट्रॅकवर पडूनही बाळ सुरक्षित आहे. चंदना शाह अस (26)  महिलेचे नावं आहे.  चंदना शाह मूळची पश्चिम बंगालची आहे. मात्र, नुकतंच जन्माला आलेलं हे बाळ कुसा स्टेशनजवळ चालत्या ट्रेनच्या शौचालयामधून थेट ट्रॅकवर पडलं. यानंतर महिलेने आरडाओरडा केल्याने ट्रेन तात्काळ थांबवून बाळाला ट्रॅकवरुन उचललं. त्यानंतर कुसा गावचे रहिवासी, रेल्वे कर्मचारी यांच्या मदतीने बाळाला आणि आईला रुग्णालयात दाखल केलं. दोघेही सुखरुप आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रक्त फेकण्यात महाराष्ट्र आघाडीवर